गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , मंगळवार, 14 मार्च 2017 (13:01 IST)

दिल्लीत महिलेवर गँगरेप, भितीमुळे बाल्कनीतून उडी मारली

पूर्वी दिल्लीत रविवारी सकाळी 28 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कारच्या घटनेमुळे दिल्ली पुन्हा हादरली आहे. पीडित महिलेने दिलेल्या वृत्तानुसार आरोपींमध्ये एकाने तिला घरी सोडतो असे तिला सांगितले होते, पण तो तिला एका भाड्याच्या खोलीत घेऊन गेला जेथे 5 लोकांनी तिच्यावर बलात्कार केला असून नराधमांनी पीडितेला एका घरात डांबून ठेवले होते. पहिल्या मजल्यावरून उडी मारून पीडितेने स्वतःची सुटका करून घेतली आणि हा धक्कादायक प्रकार उघड झाला. या प्रकरणातील पाचही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
 
दिल्लीत राहणारी २८ वर्षीय पीडित महिला ही घटस्फोटित असून तिला दोन मुलं आहेत. ती रोजंदारीवर पार्ट टाईम काम करते. शनिवारी रात्री घरी परतत असताना तिला तिच्या ओळखीतला एक तरुण भेटला. घरी सोडतो असे सांगत त्याने पीडितेला गाडीत बसवले. पीडित महिलेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार गाडीत आधीपासूनच दोन जण होते. या दोघांना सोडल्यानंतर तूला घरी सोडतो असे त्या तरुणाने पीडितेला सांगितले. यानंतर नराधमांनी त्या महिलेला जबरदस्तीने पांडवनगरमधील एका घरात नेले. तिथे काही वेळाने आणखी दोन जण आले. यानंतर सर्वांनी मिळून पीडितेवर सामूहिक बलात्कार केला. अत्याचारानंतर पीडित महिला बेशुद्ध पडल्याने नराधमांनी तिला घरातील एका खोलीत डांबून ठेवले. रविवारी या महिलेने धाडस दाखवत कशीबशी स्वतःची सुटका करुन घेतली.
 
 रविवारी शुद्धीत आल्यावर पीडितेने मदत मागण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत पाचही नराधम खोलीच्या दिशेने येत असल्याचे पीडितेच्या लक्षात आले. पुन्हा त्यांच्या तावडीत सापडण्याऐवजी पीडितेने पहिल्या मजल्यावरुन खाली रस्त्यावर उडी मारण्याचा निर्णय घेतला. पीडितेने उडी मारल्याचे दृश्य घटनास्थळाजवळील एका सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाले आहे. महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलिसांनी पाचही नराधमांना अटक केली आहे. यातील एक तरुण बेरोजगार असून उर्वरित तिघे जण बीपीओमध्ये कामाला होता. तर एक नराधम हा फायनान्स कंपनीत कामाला होता.