शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 14 ऑक्टोबर 2017 (16:52 IST)

गौरी लंकेश हत्या : संशयित मारेकऱ्यांचे रेखाचित्र जारी

ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्याप्रकरणातील संशयित मारेकऱ्यांचे रेखाचित्र शनिवारी जारी करण्यात आले. संशयितांनी हत्येपूर्वी घटनास्थळाची रेकी केली आणि यासंदर्भातील एक व्हिडिओदेखील आमच्या हाती लागला आहे अशी माहिती विशेष तपास पथकातील अधिकाऱ्यांनी दिली.

निवारी एसआयटीचे प्रमुख बी के सिंह यांनी पत्रकार परिषद घेऊन संशयित मारेकऱ्यांचे रेखाचित्र जारी केले. आम्ही या प्रकरणात सुमारे २०० ते २५० जणांची चौकशी केली. या आधारे आम्ही हे रेखाचित्र तयार केल्याचे त्यांनी सांगितले. साक्षीदारांनी दिलेल्या माहितीच्या आधारे दोन स्केच आर्टिस्टकडून आम्ही हे रेखाचित्र तयार करुन घेतले असे त्यांनी सांगितले. हत्येच्या आठवडाभरापूर्वी मारेकरी बंगळुरुत ठाण मांडून होते आणि त्यांनी गौरी लंकेश यांच्या निवासस्थानाच्या परिसराची रेकीदेखील केली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.

गौरी लंकेश यांची ५ सप्टेंबर रोजी बंगळुरुतील निवासस्थानी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. गौरी लंकेश या साप्ताहिक ‘लंकेश पत्रिका’च्या संपादिका होत्या.