शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 15 मे 2024 (16:59 IST)

तंत्रज्ञान क्षेत्रात मुलींना पूर्ण हक्क, समान वाटा मिळाला पाहिजे - ईशा अंबानी

• ‘गर्ल्स इन इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी (GICT) इंडिया – 2024’ दूरसंचार विभाग आणि संयुक्त राष्ट्र एजन्सीने संयुक्तपणे आयोजित केला 
• मुलींच्या हक्काच्या लढ्यात सरकारसोबत उद्योगांनाही पुढे यावे लागेल.
 
चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या या डिजिटल युगात भारताला जागतिक नेता म्हणून उदयास यायचे असेल तर मुलींना पुढे आणावे लागेल. विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि माहिती व संपर्क तंत्रज्ञान या क्षेत्रात मुलींचा सहभाग वाढवावा लागेल. दूरसंचार विभागातर्फे आयोजित ‘गर्ल्स इन आयसीटी इंडिया – २०२४’ या कार्यक्रमात मुलींशी बोलताना, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या संचालिका ईशा अंबानी यांनी त्यांना करिअर म्हणून तंत्रज्ञान स्वीकारण्यास प्रोत्साहित केले. ईशा म्हणाल्या, तंत्रज्ञान क्षेत्रात महिला आणि पुरुषांचे प्रमाण समान असले पाहिजे. यासाठी अजून बराच पल्ला गाठायचा आहे.
 
'गर्ल्स इन इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी (GICT) इंडिया - 2024' चे आयोजन दूरसंचार विभाग - भारत सरकार, आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ (दक्षिण आशिया), इनोव्हेशन सेंटर - दिल्ली आणि इतर UN एजन्सी यांनी संयुक्तपणे केले होते.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे कौतुक करताना ईशा अंबानी म्हणाल्या की, “सरकार आवश्यक सुधारणा करत आहे आणि त्याचे परिणामही दिसत आहेत. गेल्या दशकात तंत्रज्ञान क्षेत्रातील महिलांचे प्रतिनिधित्व 6% ने वाढले आहे, परंतु उद्योगाने देखील आपली भूमिका करणे आवश्यक आहे. त्यांना अशा पद्धती आणि माध्यमे तयार करावी लागतील ज्यामुळे महिलांच्या करिअरमध्ये स्थिरता येईल. एकत्रितपणे, आपण असे भविष्य घडवू शकतो जिथे आपल्या मुलींना उद्याचे नेते बनण्याची समान संधी मिळेल. ,
 
ईशा अंबानीने त्यांची आई नीता अंबानी यांचा उल्लेख करताना सांगितले की,त्यांनी वारंवार सांगितले आहे की, "पुरुषाला सशक्त बनवाल तर तो एका कुटुंबाचे पोषण करेल. तर एक महिला सक्षम झाली तर ती संपूर्ण गावाला पोट भरेल." त्या पुढे म्हणाल्या ,मला माझ्या आईच्या या गोष्टीवर पूर्ण विश्वास आहे की "महिला जन्मतःच नेत्या आहेत,त्यांचातील जन्मजात निस्वार्थीपणा त्यांना चांगला नेता बनवतो. महिला कर्मचाऱ्यांना त्यांच्या करिअरच्या सुरुवाती पासूनच प्रोत्साहन दिले पाहिजे. फक्त कागदावर विविधता आणि सर्वसमावेशकता दाखवल्याने काही बदल होणार नाही  असे मला वाटते.