testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

गोवा एक्सप्रेसच्या डब्याला शॉर्ट सर्कीटमुळे लागली आग मोठा अनर्थ टळला

Last Modified बुधवार, 30 नोव्हेंबर 2016 (17:45 IST)
रेल्वे अपघता होत अनेकांना आपला जीव गमवावा लागतो , मात्र वेळीच प्रसंगावधानामुळे अनेकांचे जीव वाचतात अशी घटना घडली आहे मनमाड येथे. आज एक मोठी रेल्वे दुर्घटना वेळीच दक्षता घेतल्याने
टाळण्यात यश आले आहे. मनमाड येथे आलेल्या वास्को निजामुद्दीन गोवा एक्सप्रेसच्या जनरल डब्याला शॉर्ट सर्कीटमुळे लागलेली आग लागली होती. मात्र त्वरित केलेल्या उपायाने
मनमाडला स्टेशनला आटोक्यात आली. त्यामुळे पुढचा अनर्थ टळला आहे. गाडीतील त्या डब्यातील प्रवासी तर वाचलेच
मात्र जर चालत्या गाडीत हा प्रकार घडला असता तर फार मोठी घटना घडली असती.

आज दुपारी बाराच्या सुमारास ही गाडी मनमाड स्थानकाजवळ काही अंतरावर असतानाच जनरल डब्यातून धूर निघू लागला. त्यामुळे घाबरून काही प्रवाशांनी चालत्या गाडीतून उड्या टाकल्या. त्यात दोन महिला जखमी झाल्या आहेत.
दरम्यान मनमाड रेल्वे स्थानकावर आल्यानंतर रेल्वे प्रशासनाने त्वरित आग विझविली. या डब्यातील इलेक्ट्रीक पॅनलमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर हा डबा बाजूला काढण्यात आला आहे.

पुढे दोन अडीच तास ही मनमाड स्थानकातच थांबून होती. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली होती.


यावर अधिक वाचा :