शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 9 नोव्हेंबर 2016 (13:36 IST)

सोन्याचे भाव वाढले, शेअर मोर्केट कोसळले

मोदी सरकारने हजार आणि पाचशेच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर अचानकपणे सोन्याच्या दरांमध्ये मोठी वाढ झाली आहे. सोन्याचा प्रतितोळा भाव ३४ हजारांवर जाऊन पोहोचला आहे. यापूर्वी एक तोळा सोन्यासाठी ३० हजारांच्या आसपास रक्कम मोजावी लागत होती. मात्र, त्यामध्ये अचानकपणे ४ हजारांची वाढ झाली आहे. आगामी काळात सोन्याचा भाव प्रतितोळा ४० हजारापर्यंत जाण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.
500 आणि 1000च्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णयानंतर सोमवारी शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. दुपारी बारा वाजेपर्यत सेन्सेक्स तब्बल 1500 अकांनी गडगडला होता. तर निफ्टीमध्ये 468 अकांची घसरण झाली.  सोबतच अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदासाठी ट्रम्प यांनी हिलरी यांना पराभूत केल्यानेही ही घसरण झाली आहे.