Widgets Magazine
Widgets Magazine

गोरखपुरमध्ये ऑक्सीजन पुरवठा ठप्प झाल्याने 30 मुलांचा मृत्यू

गोरखपूर, शनिवार, 12 ऑगस्ट 2017 (09:45 IST)

उत्तर प्रदेशमधील गोरखपूरमध्ये बीआरडी मेडिकल कॉलेज रुग्णालयातील ऑक्‍सिजनचा पुरवठा बंद केल्याने तब्बल 30 मुलांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या मुलांचे मृत्यू मागील 36 ते 48 तासात झाल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे 9 ऑगस्टलाच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बीआरडी मेडिकल कॉलेजचा पाहणी दौरा केला होता.
 
गोरखपूरचे जिल्हाधिकारी राजीव रौतेला यांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 मुले एनएनयू वॉर्डमध्ये दाखल होती, तर 17 मुले मेंदूज्वर वॉर्डमध्ये दाखल होती. मागील 48 तासांत 30 मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांनी दिली.
बाबा राघव दास रूग्णालयात अनेक गरीव रूग्णांवर उपचार केले जातात. मेंदूज्वर विभागातही लहान मुलांवर उपचार सुरू असतात. मात्र गेल्या दोन दिवसांपासून या रूग्णालयात ऑक्‍सिजनची कमतरता भासत होती. या रूग्णालयाचे 69 लाखांचे ऑक्‍सिजनचे बिल थकल्यामुळे पुरवठा बंद करण्यात आला होता. तसेच सिलिंडरही संपले होते. त्यामुळे मागील 48 तासांमध्ये लहान मुलांना आपला जीव गमावावा लागला आहे.
 
रौतेला म्हणाले, मेडिकल कॉलेजमध्ये ऑक्‍सीजनची उपलब्धता करून देण्यासाठी संत कबीर नगर जिल्ह्यातून पर्यायी व्यवस्था करण्यात आली होती. तसेच ऑक्‍सीजन पुरवठा करणाऱ्या कंपनीलाही आंशिक भुगतान देण्यात आले होते. याप्रकरणी चौकशी करण्यासाठी एक समिती गठित करण्यात आली असून उद्या संध्याकाळपर्यंत अहवाल देण्याचे आदेश देण्यात आले आहे. या मृत्यूप्रकरणी दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही रौतेला यांनी सांतिगले.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

बिहारमधील जिल्हाधिकारी मुकेश पांडे यांची आत्महत्या

बिहारमधील बक्‍सरचे जिल्हाधिकारी मुकेश पांडे यांनी उत्तरप्रदेशात आत्महत्या केल्याची ...

news

पंढरपूरच्या धर्तीवर त्र्यंबकेश्वरमध्ये निर्मळवारी अभियान

श्रीक्षेत्र पंढरपूर येथे दरवर्षी वारीच्या निमित्ताने येर्णा्या लाखो वारकरी भाविकांची सेवा ...

news

मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करा, धनंजय मुंडे, अमरसिंह पंडित यांची सभागृहात मागणी

गेल्या ४२ दिवसांपासून मराठवाड्यात पावसाचा थेंब नाही, मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करावा ही ...

news

डीजें साउंड सिस्टीम व्यावसायिकांनी 15 ऑगस्ट ‘नो साउंड डे’ घोषित केला

दहीहंडी, गणेशोत्सव यासारखे सण तोंडावर आले आहेत. मात्र या सणांना साऊंड सिस्टीम देणार ...

Widgets Magazine