गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 23 ऑगस्ट 2024 (13:27 IST)

ताप, संसर्ग,सर्दी, खोकल्याच्या 156 FDC औषधांवर सरकारने बंदी घातली

medicines
केंद्र सरकार ने 156 फिक्स्ड डोज कॉम्बिनेशनच्या औषधांवर बंदी घातली. हे औषध ताप, सर्दी, खोकल्यावर घेतले जात होते. आरोग्य मंत्रालयाच्या तज्ञ समितीने या औषधांचे मिश्रण योग्य नसल्याचे तपासणीत आढळले.
त्यामुळे सरकारने या औषधांच्या विक्रीवर, साठवणवर तातडीनं  बंदी लावण्याचे आदेश दिले आहे. 

या यादीमध्ये विविध प्रकारचे प्रतिजैविक, वेदनाशामक, अँटी-एलर्जिक औषधे आणि मल्टीविटामिन समाविष्ट आहेत.केंद्र सरकार  पॅरासिटामॉल वर सुद्धा बंदी घातली आहे. औषधांवर लावण्यात आलेल्या या बंदीमुळे लोकांच्या जीवाला होणाऱ्या धोका टाळता येईल कारण हे मिश्रण आरोग्यासाठी हानिकारक असण्याची शक्यता आहे. 

या बंदी घातलेल्या औषधांमध्ये पॅरासिटामॉल वर सुद्धा बंदी घातली आहे.या औषधांमुळे आरोग्याला धोका निर्माण होत असल्याचे तपासणीत आढळून आले. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने या औषधांच्या निर्मिती, विक्री आणि वितरणावर पूर्णपणे बंदी घालणारी अधिसूचना जारी केली आहे.
 
औषधासाठी सुरक्षित पर्याय उपलब्ध असतानाही या एफडीसीच्या वापरामुळे मोठ्या प्रमाणात लोकांना धोका होण्याची शक्यता आहे, असे मंत्रालयाने म्हटले आहे.
Edited by - Priya Dixit