गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मुंबई , रविवार, 22 ऑगस्ट 2021 (12:09 IST)

पाणीपुरीसाठी वापरण्यात येणार्या पाण्यात लघवी मिसळली (व्हिडिओ)

सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहून तर आपण चांगलाच संताप व्यक्त कराल. या व्हिडीओमध्ये एका पाणीपुरी विक्रेत्याने पाणीपुरीसाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्यामध्ये आपली लघवी टाकली आहे. 
 
व्हिडीओमध्ये काय आहे ?
व्हायरल होत असलेला व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. हा व्हिडीओ गुवाहाटीमधील आहे. या व्हिडीओमध्ये पाणीपुरीच्या ठेल्यावर एक माणूस दिसतोय. हा माणूस पाणीपुरी तयार करणारा आहे. त्याने एका प्लास्टिकच्या मगमध्ये लघवी केल्याचे दिसत आहे. नंतर तीच लघवी त्याने खाली जमिनीवर आणि पाणी असलेल्या बकेटमध्ये टाकली आहे. ज्या ठिकाणी लोकांना पाणीपुरी दिली जाते, त्याच ठिकाणी पाणीपुरीवाल्याने लघवी केली आहे. विशेष म्हणजे बकेटमधील पाणी नंतर प्लेट धुण्यासाठी वापरले जात आहे.
 
पाणीपुरीवाल्याला पोलिसांनी केलं अटक
हा सर्व प्रकार संतापजनक असून नेटकरी हा व्हिडीओ पाहून पाणीपुरीवाल्यावर कारवाईची मागणी करत आहेत. या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर धुमाकूळ उडाल्यामुळे पोलिसांनी या पाणीपुरीवाल्याला अटक केली आहे. पोलीस पुढील कारवाई करत आहेत.