Widgets Magazine

बद्रीनाथ येथून हरिद्वारला जाताना हॅलिकॉप्टर कोसळले!

Last Modified शनिवार, 10 जून 2017 (12:21 IST)
बद्रीनाथ येथे यात्रेकरुंना घेऊन जाणारे हॅलिकॉप्टर शनिवारी सकाळी कोसळले. हा अपघात हॅलिकॉप्टरने टेक-ऑफ घेतल्यानंतर झाला.
हा हॅलिकॉप्टरच्या पंख्याने गळा कापल्याने एका इंजिनीअरचा या अपघातात मृत्यू झाला.

दोघे पायलटही या अपघातात जखमी झाले. या अपघातात 5 ही यात्रेकरु सुरक्षितरित्या बचावले आहेत.

वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत डीजीसीए (डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एविएशन) अधिकाऱ्यांनी सांगितले की, या अपघातात एका क्रू मेंबरचा मृत्यू झाला आहे. या अपघातात दोघे पायलट जखमी झाले आहेत.
चमोली येथील पोलिसांनी सांगितले की, इंजिनीअरचा मृत्यू हा रोटर ब्लेडने गळा कापल्याने झाला आहे. डीजीसीए अधिकाऱ्यांनी सांगितले की अगस्ता 119 हे हॅलिकॉप्टर मुंबईतील क्रिस्टल एविएशन या कंपनीचे आहे. त्याने सकाळी 7:45 वाजता उड्डाण केले होते.


यावर अधिक वाचा :