1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 18 फेब्रुवारी 2019 (17:29 IST)

हिंजवडीतील आयटी हबमध्ये ‘हाय अलर्ट’.

पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवडजवळच्या हिंजवडीतील आयटी हबमध्ये ‘हाय अलर्ट’ देण्यात आला आहे. महत्त्वाचं म्हणजे हा अलर्ट थेट केंद्रीय सुरक्षा बलाच्या मुख्य कार्यालयाकडून देण्यात आला आहे. पुलवामा इथे झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हा अलर्ट देण्यात आल्याने, हिंजवडी येथील आयटी हबची सुरक्षा यंत्रणा अधिकच सतर्क झाली आहे.
 
परदेशी कंपन्यांमुळे हिंजवडी आयटी हबला अतिरेकी संघटनांपासून धोका असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली. त्यामुळे कंपन्यांच्या सुरक्षेसाठी केंद्रीय सुरक्षा बलाच्या जवनांच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. पुलवामा हल्ल्यानंतर कमांडर खेतान यांनी हिंजवडी इथे तैनात असलेल्या सुरक्षा बलाच्या जवानांची तातडीने बैठक घेतली. त्यांतर इथे सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली.