Widgets Magazine

मदरशांना राष्ट्रगीत गाण्यापासून सूट नाही

Madrasas
Last Modified गुरूवार, 5 ऑक्टोबर 2017 (09:41 IST)

मदरशांमध्ये राष्ट्रगीत सक्तीचे करण्याच्या उत्तर प्रदेशातील योगी सरकारच्या निर्णयावर आता हायकोर्टानेही शिक्कामोर्तब केले आहे. योगी सरकारच्या याचिकेला आव्हान देणारी याचिका अलाहाबाद हायकोर्टाने आज फेटाळून लावली आहे. मदरशांना राष्ट्रगीत गाण्यापासून सूट मिळणार नाही असे हायकोर्टाने स्पष्ट केले आहे.

राष्ट्रगीत आणि तिरंग्याचा सन्मान असंवैधानिक कर्तव्य आहे असे हायकोर्टाने पुढे म्हटले आहे. राष्ट्रगीत हे जात, धर्म आणि भाषा भेदांपलिकडचे असल्याचे म्हणत, हायकोर्टाने मदरशांकडून घेण्यात आलेले आक्षेप फेटाळून लावले. हायकोर्टाच्या या निर्णयानंतर आता मदरशांसाठी राष्ट्रगीत बंधनकारक झाले आहे.यावर अधिक वाचा :