testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

Widgets Magazine
Widgets Magazine

रक्तस्त्राव आणि मानसिक धक्क्यामुळे प्रद्युमनचा मृत्यू

Last Modified शनिवार, 16 सप्टेंबर 2017 (16:44 IST)

प्रद्युमनचा शवविच्छेदन अहवाल समोर आला असून रक्तस्त्राव आणि मानसिक धक्क्यामुळे प्रद्युमनचा मृत्यू झाल्याचे कारण या अहवालात नमूद करण्यात आले आहे. याआधी

गुरुग्राम येथील रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये ८ सप्टेंबर रोजी प्रद्युमन ठाकूर या मुलाची हत्या झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या हत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.

एका बाजूने धार असलेल्या शस्त्राने गळ्यावर झालेला वार खोलवर गेला होता. त्यामुळेच रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणावर झाला असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. मागील शुक्रवारी म्हणजेच ८ सप्टेंबरला प्रद्युमन ठाकूरचा मृतदेह रायन इंटरनॅशनल स्कूलच्या स्वच्छतागृहात आढळला होता. ही हत्या बस कंडक्टरने केल्याची माहिती समोर आली होती ज्यानंतर २४ तासांच्या आत अशोक कुमार या कंडक्टरला अटक करण्यात आली.यावर अधिक वाचा :