शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

व्हॉट्सअॅप मेसेजमुळे मृत्युदंडाची शिक्षा

एका व्हॉट्सअॅप मेसेजमुळे एका व्यक्तीला  मृत्युदंडाची शिक्षा झाली आहे. या प्रकरणात एका मित्राला व्हॉट्सअॅपवर धर्माबाबत अपमानजनक मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीला मृत्यूची शिक्षा सुनावण्यात आली आहे. हा मेसेज सेंड केल्यानंतर आरोपी व्यक्तीला संतप्त नागरिकांनी घेरले. मात्र, त्याने तेथून पळ काढला आणि पोलीस स्टेशन गाठलं. जेम्स मसीह नावाच्या व्यक्तीने पोलिसांत तक्रार दाखल केली होती की, त्याने व्हॉट्सअॅपवर एक कविता पाठवली होती. त्या कवितेत धर्माचा अपमान करण्यात आला होता. त्यामुळे संतप्त नागरिकांनी त्याच्यावर आपला राग व्यक्त करण्याचा प्रयत्न केला मात्र, त्याने घटनास्थळावरुन पळ काढला.आरोपी व्यक्तीने पोलिसांत आत्मसमर्पण केले. त्यानंतर या प्रकरणी न्यायालयात खटला चालला. न्यायालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, जेम्स मसीह याला मृत्युदंडासोबतच आरोपीला ३ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.