सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : गुरूवार, 31 जानेवारी 2019 (19:43 IST)

पत्नीला सोशल मीडियाचे व्यसन, पतीने पत्नीसह बाळाचा केला खून

सोशल मीडियामुळे ओळख होऊन राजू आणि सुषमा एकत्र आले. पुढे लग्न केले. मात्र तोपर्यत सुषमाला सोशल मीडियाचे व्यसन लागले होते. ती घरकामांकडे दुर्लक्ष करुन जास्तीत जास्त वेळ स्मार्टफोनमध्ये घालवत असल्याने संतापलेल्या राजूने तिची हत्या केली. त्यानंतर राजूने त्यांच्या तीन महिन्यांच्या बाळालाही मारले. बाळाचे त्यांनी नामकरणही केले नव्हते. 
 
 
बंगळुरुजवळच्या बिदादी येथे २० जानेवारी रोजी हे दुहेरी हत्याकांड घडले. रामनगरा जिल्हा पोलिसांनी एस.के.राजूला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर त्याने सुषमा आणि बाळाची हत्या केल्याची कबुली दिली. सुषमा फेसबुक, इन्स्टाग्रामच्या पूर्णपणे आहारी गेली होती. घरकाम, स्वच्छतेकडे ती अजिबात लक्ष देत नव्हती. त्यामुळे आपण तिची हत्या केली असे राजूने सांगितले.