शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

भारतातील पहिले गे मॅरिज ब्युरो अहमदाबादमध्ये

भारताचे पहिले गे मॅरिज ब्युरो गुजरातच्या अहमदाबाद शहरात सुरू केले गेले आहे. यात आतापर्यंत गुजरात, दिल्ली, बंगळुरु, हैदराबाद, चंदीगड आणि केरळचे 42 समेत दुनियाभरातील 1200 हून अधिक गे व्यक्ती जुळले आहेत. यातून 24 लोकांना आतापर्यंत त्यांच्या पसंतीचा साथीदार सापडला.
शहरातील मणिनगर क्षेत्रात हे ब्युरो चालवत असलेल्या 23 वर्षीय उर्वी शाहने म्हटले की मला कायद्यात राहून समाजात राहणारे एलजीबीटी वर्गासाठी काही करण्याची इच्छा होती. अश्या लोकांसाठी एनजीओ उघडून लढण्यात वेळ घालवण्याऐवजी मी अरेंज गे मॅरिज नावाची कंपनी उघडली. आतापर्यंत यात 1200 हून अधिक लोकांनी आपली माहीत नोंदवली आहे. यात गुजरातमध्ये अहमदाबाद, वडोदरा, भावनगर, सूरत आणि आणंद येथून मोठ्या प्रमाणात गे जुळलेले आहेत.
 
या ब्युरोत आतापर्यंत 24 गे आपले साथी पसंत करून चुकले आहे. तसेच कायद्याप्रमाणे गे लग्नाला परवानगी नसल्यामुळे ते लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत आहे. त्यातून चार गे आपल्या पार्टनर्सला भेटायला भूतान, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि रशिया गेले आहेत.
 
उर्वीप्रमाणे, संस्थाचे स्थापक बेन हर अमेरिकेत सरोगेसीसाठी काम करतात. तेथे मोठ्या प्रमाणात गे कपल येत असतात. तेथूनच अरेंज गे मॅरिज ब्युरो सुरू करण्याची प्रेरणा मिळाली. या ब्युरोत 27 लोकांची टीम आहे, जी इच्छुक लोकांची माहिती गोळा करून त्याच्या आवडीप्रमाणे पार्टनर शोधण्यात मदत करते.