शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

यंदा दिल्लीत ‘इंडिया मोबाईल काँग्रेस’चं आयोजन

यंदा दिल्लीत ‘इंडिया मोबाईल काँग्रेस’चं आयोजन केलं जाणार आहे. दरवर्षी बार्सिलोनामध्ये अशाप्रकारची काँग्रेस भरते. दिल्लीतील प्रगती मैदानात 27 ते 29 सप्टेंबरदरम्यान ‘इंडिया मोबाईल काँग्रेस’चं आयोजन होणार आहे. यासाठी 15 कोटींच्या खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. या काँग्रेसमध्ये सुमारे 8 ते 10 देश सहभागी होण्याची शक्यता आहे. दूरसंचार विभाग आणि माहिती तंत्रज्ञान विभागाच्या सहकार्याने या कार्यक्रमाचं आयोजन केलं जाईल.
 
सीओएसआयचे महासंचालक राजन एस. मॅथ्थ्यूज यांनी आयएएनएसशी बोलताना सांगितले, “पाश्चिमात्य देशांमध्ये बार्सिलोनात एमडब्ल्यूसी, तर शांघायमध्ये वर्ल्ड मोबाईल काँग्रेस असतं, मात्र दक्षिण-पूर्व आशियात तंत्रज्ञान क्षेत्रातील कोणताही मोठा कार्यक्रम नसतो. त्यामुळे दिल्लीत होणारी इंडिया मोबाईल मोबाईल काँग्रेस ही कमतरता भरुन काढेल.” स्वीडन, इस्रायल आणि इंग्लंडसारख्या बड्या देशांनी इंडिया मोबाईल काँग्रेसमध्ये सहभागी होण्याबाबत इच्छा व्यक्त केली आहे. तर या आयोजनात अमेरिका आणि कॅनडाची मदत व्हावी, याठी चर्चा सुरु आहे.