Widgets Magazine

भारत सदिच्छा हेतूने 11 पाकिस्तानी कैद्यांची सुटका करणार

भारत सरकार
सदिच्छा हेतूने 11 पाकिस्तानी कैद्यांची सुटका करणार आहे. कझाकस्तान येथे शांघाय परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यामध्ये झालेल्या अनौपचारिक भेटीनंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.
या कैद्यांनी त्यांची शिक्षा भोगून पूर्ण केलेली असल्यामुळे पाकिस्तानने त्यांच्या सुटकेची मागणी केली होती. भारतीय नागरीक कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेनंतर भारताकडून प्रथमच अशा प्रकारे कैद्यांची सुटका करण्यात येणार आहे.अस्ताना येथे झालेल्या मोदी-शरीफ भेटीनंतर हा निर्णय झाल्याने या कैद्यांच्या सुटकेला एक वेगळे महत्व आहे. नवाझ शरीफ यांच्या शस्त्रक्रियेनंतर प्रथमच या दोन नेत्यांची भेट झाल्याचे सूत्रांनी सांगितले. पंतप्रधान मोदींनी शरीफ आणि त्यांच्या आईच्या तब्येतीचीही विचारपूस केली.


यावर अधिक वाचा :