पाकिस्तानी सैन्याच्या सात चौक्या उद्धवस्त
भारतीय सैन्याने मोठी कारवाई करत नियंत्रण रेषेपलीकडील पाकिस्तानी सैन्याच्या सात चौक्या उद्धवस्त केल्या आहेत. पाकिस्तानी सैन्याकडून पूँछ, राजौरीमधील नागरीवस्त्यांवर गोळीबार, तोफांचा मारा सुरु होता.
पाकिस्तानच्या या गोळीबारात एका सहा वर्षीय मुलीचा मृत्यू झाला तर अनेक नागरीक जखमी झाले होते. भारताच्या कारवाईत पाकिस्तानी सैन्याचीही जिवीतहानी झाली आहे. पाकिस्तानने आपले तीन सैनिक ठार झाल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानकडून होणाऱ्या गोळीबाराच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून पूँछ आणि राजौरी सीमेवरील सर्व शाळा बंद करण्यात आल्या आहेत.