शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 28 जून 2017 (12:10 IST)

जवानांसाठी नवीन बुलेटप्रुफ हेल्मेट

सैन्याच्या जवानांसाठी केंद्र सरकारने नवीन बुलेटप्रुफ हेल्मेट घेतले आहे. गेल्या दशकभरापासून जवानांसाठी बुलेटप्रूफ हेल्मेटची मागणी केली जात होती. केंद्र सरकारने वर्षाच्या सुरुवातीला कानपूरमधील एमकेयू लिमिटेड या कंपनीला बुलेटप्रूफ हेल्मेटचे कंत्राट दिले होते. यूके आणि नाटोच्या सैन्यालाही याच कंपनीने हेल्मेट पुरवले होते. संरक्षण मंत्रालयासोबत झालेल्या १८० कोटी रुपयांच्या या करारानुसार कंपनी सैन्याला १ लाख ६० हजार बुलेटप्रूफ हेल्मेट देणार आहे. यातील पहिल्या टप्प्यातील हेल्मेट सैन्याकडे सुपूर्त करण्यात आले. जागतिक पातळीवरील निकषाचे या हेल्मेटमध्ये पालन करण्यात आले आहे. या हेल्मेटमध्ये कम्यूनिकेश डिव्हाईस आणि नाईट व्हिजन डिव्हाईसही लावणे शक्य होणार आहे. सैन्याला दिलेले हेल्मेट ९ मिलीमीटर गोळीचा मारा सहन करु शकतील असे कंपनीने म्हटले आहे.