पुणे आणि सूरतशी जोडले जाईल इंदौर, दोन एयरलाईन्सने सहमती

Last Modified गुरूवार, 4 मार्च 2021 (08:06 IST)
देवी अहिल्याबाई होळकर अंतरराष्ट्रीय एयरपोर्टहून लवकरच गुजरातचे प्रमुख शहर सूरत आणि महाराष्ट्रातील पुणेसाठी उड्डाण सुरू होईल. खासगी एयरलाईन्स फ्लायबिग आणि एयर इंडियाने यासाठी सहमती दर्शवली आहे.
प्राप्त माहितीनुसार, मागील काही दिवसांपूर्वी शहरातील एका औद्योगिक संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी एयरपोर्ट डायरेक्टर यांची भेट घेऊन मागणी केली होती की, त्यांनी पुणे आणि सूरतसाठी उड्डाण सुरू करावे. या दोन्ही शहरांसाठी उड्डाण नसल्याने लोकांना कनेक्टिंग उड्डाण घ्यावे लागते. ज्यामुळे खुप वेळ लागतो. डायरेक्टर यांनी यासाठी योग्य ती मदत करण्याचे आश्वासन दिले होते. डायरेक्टर यांच्यानुसार, त्यांनी फ्लायबिगच्या अधिकार्‍यांना सूरतचे उड्डाण सुरू करण्यास सांगितले तेव्हा ते यासाठी तयार झाले.
डायरेक्टर यांनी सांगितले की, फ्लायबिग कंपनीचे एक 72 सीटर विमान याच महिन्यात येणार आहे. ज्यानंतर ते सुरू होईल. याशिवाय मागील काही दिवसांपूर्वी एयर इंडियाचे मोठे अधिकारी इंदौर येथे आले होते, त्यांच्याशी चर्चा करून पुणेसाठी उड्डाण सुरू करण्यास सांगण्यात आले आहे. ते सुद्धा यासाठी तयार आहेत. कंपनी लवकरच ते सुरू करेल. याच महिन्याच्या अखेरपासून समर शेड्यूलसुद्धा लागू होत आहे. ज्यामध्ये अनेक शहरांसाठी उड्डाण सुरू होतील. सध्या आम्हाला शेड्यूल मिळालेले नाही. मात्र, लॉकडाऊनच्या अगोदर ज्या शहरांसाठी उड्डाण सुरू होती त्या जवळपास सर्व शहरांसाठी पुन्हा उड्डाणे सुरू झाली आहेत. काही नवीन शहरे सुद्धा या महिन्याच्या अखेरीस जोडली जातील.


यावर अधिक वाचा :

लग्न समारंभातबाबत राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर

लग्न समारंभातबाबत राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर
लॉकडाऊनमुळे रखडलेल्या लग्न समारंभातबाबत राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ...

पिंपरी चिंचवड शहरातील ‘या’ आठ लसीकरण केंद्रावर मिळणार लसीचा ...

पिंपरी चिंचवड शहरातील ‘या’ आठ लसीकरण केंद्रावर मिळणार लसीचा दुसरा डोस
कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना लसीचा दुसरा ...

राज ठाकरें उद्धव ठाकरे याच्या पाठीशी लिहिलं PM मोदींना ...

राज ठाकरें उद्धव ठाकरे याच्या पाठीशी लिहिलं PM मोदींना पत्र; पत्रातून मांडल्या ‘या’ महत्त्वपूर्ण मागण्या
देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून महाराष्ट्राला या व्हायरसचा सर्वाधिक फटका बसला आहे. ...

शहरात सुरु होते भामट्या महिलेचे ‘कार’नामे ! अखेर पोलिसांनी ...

शहरात सुरु होते भामट्या महिलेचे ‘कार’नामे ! अखेर पोलिसांनी केली अटक…
अहमदनगर शहरात वाहनचालकांकडून लिफ्ट मागून नागरिकांना लुटणारी ‘ती’ भामटी महिला काही जागृत ...

आ.विखे पाटील यांची रेल्‍वेमंत्र्यांकडे विलगीकरण बोगीची ...

आ.विखे पाटील यांची रेल्‍वेमंत्र्यांकडे विलगीकरण बोगीची उपलब्‍धता करुन देण्‍याची मागणी
अहमदनगर जिल्‍ह्यात कोव्‍हीड रुग्‍णांची वाढत चाललेली संख्‍या आणि रुग्‍णालयांमध्‍ये उपलब्‍ध ...

मोदींचं कुंभमेळा प्रतीकात्मक साजरा करण्याचा आवाहन

मोदींचं कुंभमेळा प्रतीकात्मक साजरा करण्याचा आवाहन
कोरोना साथीचा प्रादुर्भाव पाहता कुंभमेळा आता फक्त प्रतिकात्मक स्वरुपात साजरा करावा, असं ...

राज ठाकरेंनी मानले केंद्र सरकारचे आभार

राज ठाकरेंनी मानले केंद्र सरकारचे आभार
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी हाफकिन्स व हिंदुस्तान अँटिबायोटिकला लस उत्पादन करण्याची परवानगी ...

UP Weekend Lockdown: उत्तर प्रदेशात दर रविवारी पूर्ण ...

UP Weekend Lockdown: उत्तर प्रदेशात दर रविवारी पूर्ण लॉकडाउन, मास्क न घालता पकडल्यास 1 हजार रुपये दंड
लखनौ. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Aditya Nath) कोरोना व्हायरस इन्फेक्शनच्या दुसऱ्या ...

CBIचे माजी संचालक रणजित सिन्हा यांचे दिल्लीत निधन

CBIचे माजी संचालक रणजित सिन्हा यांचे दिल्लीत निधन
सीबीआयचे माजी संचालक रणजित सिन्हा यांचे शुक्रवारी देशाची राजधानी दिल्लीत शुक्रवारी निधन ...

सीएम अरविंद केजरीवाल यांनी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ...

सीएम अरविंद केजरीवाल यांनी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी दिल्लीत शनिवार व रविवार कर्फ्यू लावण्याची घोषणा केली, आवश्यक सेवा सुरू राहतील
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कोरोना संसर्ग नियंत्रित करण्यासाठी दिल्लीत शनिवार व ...