गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

इस्त्रोने केले 31 उपग्रहांचे प्रक्षेपण

इस्त्रोने शुक्रवारी सकाळी PSLV-C38  रॉकेटव्दारे 31 उपग्रहांचे प्रक्षेपण केले. सकाळी 9 वाजून 29 मिनिटांनी PSLV-C38 रॉकेटने श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश तळावरुन उड्डाण केले. त्यानंतर 16 मिनिटांनी पीएसएलव्हीने कार्टोसॅट - 2 मालिकेतील उपग्रहासह अन्य 29 नॅनो उपग्रहांना आपल्या कक्षेत सोडले. इस्त्रोच्या पीएसएलव्हीचे हे 40 वे उड्डाण होते. 31 उपग्रहांमध्ये भारताचे दोन आणि 29 परदेशी उपग्रह आहेत. या उपग्रहांमध्ये कार्टोसॅट -2 मालिकेतील सहावा उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला असून कार्टोसॅटमुळे भारताची टेहळणी क्षमता वाढणार आहे. कार्टोसॅटचे वजन 712 किलो असून, अन्य 30  उपग्रहांचे मिळून 243 किलो वजन आहे.  यात  फ्रान्स, जर्मनी, इटली, जापान असे 14 देशांचे 29 नॅनो उपग्रह सुद्धा प्रक्षेपित करण्यात आले आहेत. इस्त्रोने याआधी फेब्रुवारी महिन्यात एकाचवेळी 104 उपग्रह प्रक्षेपित करुन इतिहास रचला होता.