गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 1 सप्टेंबर 2017 (12:04 IST)

‘आयआरएनएसएस-१एच’ चे प्रक्षेपण अयशस्वी

भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) ‘आयआरएनएसएस-१एच’ या उपग्रहाचे गुरुवारी  प्रक्षेपण अयशस्वी झाले. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रातून गुरुवारी हा उपग्रह पीएसएलव्हीच्या माध्यमातून अवकाशात पाठवण्यात आला होता. उष्णतारोधक आवरण वेगळे न झाल्यामुळे उपग्रहाने आपला वेग गमावला आणि परिणामी हे प्रक्षेपण अयशस्वी ठरले. अशी माहिती इस्रोच्या वतीने देण्यात आली आहे. IRNSS-1H या उपग्रहाला त्याच्या कक्षेत पोहचवण्यास PSLV-C39 यशस्वी ठरले पण त्याचे उष्णतारोधक आवरण वेगळे झाले नाही. त्याचवेळी ही प्रक्षेपण अयशस्वी होईल असे इस्रोने जाहीर केले.