testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

आयकर विभागाकडून 'आप' ला नोटीस

Last Modified सोमवार, 27 नोव्हेंबर 2017 (16:43 IST)

अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला

देणगीमधील अनियमिततेमुळे आयकर विभागाने आपला 30 कोटी 67 लाख रुपयांची नोटीस पाठवली आहे.हे पैसे पक्षाकडून वसूल का करु नयेत, अशी विचारणा आयकर विभागाने केली आहे. तसंच विभागाने 7 डिसेंबरपर्यंत उत्तर मागितलं आहे.
आयकर विभागाने म्हटलं आहे की, “निवडणूक आयोगाला दिलेला पहिला ऑडिट रिपोर्ट चुकीचा आणि जाणीवपूर्वक तयार केलेला आहे.”

आम आदमी पक्षाने रविवारीचस्थापनेची पाच वर्ष पूर्ण केली. मात्र पुढच्याच दिवशी पक्षावर भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात आयकर विभागाने नोटीस पाठवली आहे.मोदी सरकारने सूड म्हणून ही कारवाई केली आहे. राजकीय पक्षाची देणगी करपात्र उत्पन्न समजण्याची ही देशाच्या इतिहासातील पहिलीच वेळ आहे, असं आम आदमी पक्षाचा दावा आहे.
यावर अधिक वाचा :