Widgets Magazine
Widgets Magazine

घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या 3 दहशतवाद्यांचा खात्मा

गुरूवार, 8 जून 2017 (10:04 IST)

जम्मू काश्मीरमधील माछिल सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या तीन दहशतवाद्यांचा सैन्याने खात्मा केला. दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला असून गेल्या १५ दिवसांत सीमा रेषेवर तिसऱ्यांदा घुसखोरीचा डाव उधळून लावण्यात आला आहे. माछिल सेक्टरमध्ये मंगळवारी रात्री उशीरा सीमा रेषेवर तीन दहशतवादी घुसखोरी करत असल्याचे सैन्याच्या गस्ती पथकाच्या निदर्शनास आले. त्यांनी दहशतवाद्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता घनदाट जंगलाचा फायदा घेत दहशतवाद्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. यानंतर दहशतवादी आणि सैन्यामध्ये चकमक झाली आणि या चकमकीत तिन्ही दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. दहशतवाद्यांकडून शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. परिसरात शोधमोहीम सुरु आहे. Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

निवडणुक आयोगाकडून राष्ट्रपतीपदाची निवडणुक जाहीर

भारताच्या राष्ट्रपतीपदाची निवडणुक 17 जुलै रोजी होणार असल्याचे निवडणुक आयोगाने जाहीर केले ...

news

शिवसेनेचा बहिष्कार नाही, परवानगी मागितली होती : मुनगंटीवार

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला शिवसेनेच्या मंत्र्यांनी दांडी मारल्यानंतर सत्ताधारी भाजप ...

news

मंत्रिमंडळाच्या बैठकीला शिवसेना मंत्र्यांनी दांडी

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला शिवसेना मंत्र्यांनी दांडी मारली. यावेळी शिवसेनेचे परिवहन ...

news

शेतकरी संपाला नाना पाटेकरांचा पाठिंबा

शेतकऱ्याला जगण्यासाठी संप करावा लागतो ही बाब अत्यंत खेदजनक आहे, असं मत अभिनेते नाना ...

Widgets Magazine