शुक्रवार, 7 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 19 ऑगस्ट 2017 (17:50 IST)

९ गावांभोवती सुरक्षा पथकांची घेराव घालून शोध मोहिम सुरु

jammu kashmir

जम्मू-काश्मीरच्या शोपियन जिल्ह्यातील नऊ गावांभोवती सुरक्षा पथकांनी घेराव घालून शोध मोहिम सुरु केली आहे. या गावांमध्ये दहशतवादी दडून बसल्याची शक्यता असल्याने लष्कराकडून शोध मोहीम राबवण्यात येत आहे. चाकूरा, मंत्रीबग, झायपोरा, प्रताबपोरा, ताकीपोरा, रानीपोरा, रत्नीपोरा, दनगाम आणि वनगाम या गावांमध्ये सुरक्षा पथकाचे जवान दहशतवाद्यांचा कसून शोधघेत आहेत. 

लष्कराने काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात जोरदार मोहीम उघडली असून, मागच्या दोन महिन्यात लष्कराच्या कारवाईत अनेक दहशतवादी मारले गेले आहेत.