रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: श्रीनगर , गुरूवार, 22 जून 2017 (11:09 IST)

काश्मीरमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीरमध्ये दक्षिण भागातील पुलवामा जिल्ह्यात भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांच्यामध्ये झालेल्या चकमकीत भारतीय जवानांनी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. 

मारले गेलेले दहशतवादी हे 'लष्कर-ए-तोयबा' या दहशतवादी संघटनेचे आहेत. दहशतवाद्यांकडून ३ एके-४७ रायफल्ससह  दारुगोळाही जप्त करण्यात आला आहे. ही चकमक पुलवामा जिल्ह्यातील काकापोरा स्थित न्यू कालोनी भागात झाली.  
 
गस्तीवर असणाऱ्या जवानांना पाकव्याप्त काश्मीरमधून काही दहशतवादी जम्मू-काश्मीरमध्ये प्रवेश करत असल्याचे दिसले. त्यादरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल भारतीय जवानांनी केलेल्या गोळीबारात ३  दहशतवादी ठार झाले. या चकमकीत भारतीय लष्कराचा एक जवान गंभीर जखमी झाला आहे.