testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

ढगफुटीमुळे आलेल्या पूरात ६ ठार

Last Modified शुक्रवार, 21 जुलै 2017 (11:43 IST)

जम्मू-काश्मीरच्या दोडा जिल्ह्यातील

थाटरी गावात रात्री उशिरा मुसळधार पाऊस आणि ढगफुटीमुळे आलेल्या पूरामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी सकाळी बचाव पथकाला त्यांचे मृतदेह सापडले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या नैसर्गिक आपत्तीत 11 जण जखमी झाले असून, अनेक घरे, दुकानांचे नुकसान झाले आहे. एका शाळेच्या इमारतीचेही नुकसान झाले आहे. पूराच्या पाण्यामध्ये काही घरे वाहून गेली तर, काही घरे कोसळली.

बचावपथकाने ढिगा-याखालून सहाजणांसह एका 12 वर्षाच्या मुलाला बाहेर काढले. बचाव पथक मुलाच्या आई-वडीलांचा शोध घेत आहे. मध्यरात्रीच्या सुमारास अचानक झालेल्या ढगफुटीमुळे गावातून वाहणा-या नाल्याच्या पाणी पातळीत अचानक वाढ झाली आणि घरांमध्ये पाणी घुसले. नेमके किती नुकसान झालेय ते लगेच स्पष्ट होणार नाही. आम्ही बचावमोहिमेमध्ये असून जे अडकले आहेत त्यांना वाचवण्याचे आमचे प्रयत्न सुरु आहेत अशी माहिती अधिका-याने दिली. जिल्हा प्रशासनासह पोलीस, लष्कर युद्धपातळीवर मदत मोहिम राबवत आहेत.


यावर अधिक वाचा :