शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 6 एप्रिल 2022 (23:47 IST)

JEE Main 2022: एनटीएने जेईई मुख्य परीक्षेच्या तारखा बदलल्या, नवीन वेळापत्रक येथे पहा

JEE Exam
जेईई मुख्य परीक्षा 2022 मध्ये सहभागी होणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच NTA ने सत्र-1 आणि सत्र-2 परीक्षांच्या तारखा बदलल्या आहेत. यासाठी एजन्सीने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर याबाबत नोटीसही जारी केली आहे. अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर जाऊन विद्यार्थी ते तपासू शकतात.
 
एनटीएने सांगितले की मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेऊन, जेईई मेन 2022 च्या सत्र एक आणि सत्र दोनच्या तारखा बदलण्यात आल्या आहेत. 

जेईई मुख्य परीक्षा 21 एप्रिलपासून होणार होती पण आता ती पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षेच्या तारखेवरून गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. एप्रिलनंतर परीक्षा घेण्यात यावी आणि त्याचवेळी परीक्षेला बसण्यासाठी 2 ऐवजी 4संधी द्याव्यात, अशी विद्यार्थ्यांची मागणी होती. 
 
विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेऊन नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) JEE मुख्य परीक्षेच्या 2022 च्या तारखा बदलल्या आहेत. नवीन तारखांनुसार, सत्र 1 ची परीक्षा आता 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27,28 आणि 29 जून 2022 रोजी होणार आहे. त्याचवेळी सत्र 2 ची परीक्षा 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29 आणि 30 जुलै 2022 रोजी होणार आहे. 
 
अधिक तपशीलांसाठी, विद्यार्थ्यांना NTA च्या अधिकृत वेबसाइट www.nta.ac.in किंवा JEE वेबसाइट jeemain.nta.nic.in वर वेळोवेळी भेट देत राहण्याचा सल्ला देण्यात येतो. यापूर्वी 16 एप्रिल रोजी परीक्षा होती, त्यानंतर 21 एप्रिल रोजी परीक्षेची तारीख करण्यात आली होती. आता ते जून-जुलै करण्यात आले आहे. विद्यार्थी तपशीलवार वेळापत्रक NTA च्या अधिकृत वेबसाइट nta.ac.in वर पाहू शकतात.