बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 15 सप्टेंबर 2021 (12:59 IST)

Jharkhnd Road Accident : रामगढमध्ये बस आणि वॅगन आरची जोरदार धडक, पाच जण होरपळून जळाले

झारखंडच्या रामगढ जिल्ह्यातील मुरबंदा लारीजवळ बुधवारी सकाळी बस आणि वॅगन आर कारची जोरदार धडक झाली. बस कारवर चढली आणि कारने  पेट घेतला, त्यात एक मुलगा आणि दोन महिलांसह बसलेल्या पाचही जणांचा होरपळून मृत्यू झाला.
 
रामगढचे पोलीस अधीक्षक यांनी सांगितले की, सकाळी आठच्या सुमारास वॅगन आर कारच्या दुसऱ्या बाजूने येणारी बस रजराप्पा पोलीस स्टेशन परिसरातील गोला-रामगढ मुख्य रस्त्यावरील मुरबंदा लारीजवळ येऊन धडकली. बस गाडीवर चढली. कारमधील पाचही लोक त्यात अडकले होते. थोड्याच वेळात, कारने पेट घेतला आणि एक मुलगा आणि दोन महिलांसह सर्व पाच जण जागीच जळून खाक झाले. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह इतके होरपळले आहेत की त्यांची ओळख पटवणे कठीण झाले आहे.
 
पोलीस अधीक्षक म्हणाले की सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
 
ते म्हणाले की, वाहनाच्या नोंदणी क्रमांकाव्यतिरिक्त इतर तपशील सापडला नाही कारण वॅगन आर पूर्णपणे जळाली आहे. हे वाहन पाटणा येथील आलोक रोशनच्या नावाने नोंदणीकृत आहे.मृतांची ओळख आणि इतर कारवाईसाठी पाटणा पोलिसांशी संपर्क साधण्यात आला आहे.