Widgets Magazine
Widgets Magazine

कन्हैय्या कुमारकडून पंतप्रधान मोदींना टीका

मंगळवार, 8 ऑगस्ट 2017 (09:26 IST)

Kanhaiya Kumar

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिटलर बनण्याचं स्वप्न पाहू नये. तुम्ही ना हिटलर आहात, ना आम्ही गॅस चेंबरमधील यहुदी. आम्ही लढून मरु, पण झुकणार नाही, असा घणाघात विद्यार्थी नेता कन्हैय्या कुमार याने अहमदनगरमध्ये केला. यावेळी कन्हैय्याने पंतप्रधान मोदींसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही जोरदार टीका केली.

“नरेंद्र मोदी पंतप्रधान नसून अंबानी आणि अदानीचे प्रचार मंत्री आहेत. नीता अंबानींबरोबर फोटो काढतात तर जाहिरात का नाही करणार?”, असा सवाल कन्हैया कुमारने केला. “पंतप्रधान सरकारी कंपनीची जाहिरात करत नाहीत. मात्र खासगी कंपनीचा प्रचार करतात”, असा आरोप कन्हैयाने केला. अहमदनगर लाँग मार्चच्या सभेत तो बोलत होता.

यावेळी कन्हैयाने आरएसएसच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण केला. देशभक्तीचा नारा देणाऱ्या संघाच्या किती जणांनी स्वातंत्र्य लढ्यात बलिदान दिलंय?, असा सवाल कन्हैय्याने केला. शिवाय, भगव्या दहशतवादाविरोधात सर्वांनी इंद्रधनुष्यासारखं एकत्रित लढण्याचं आवाहनही कन्हैय्याने केलं.
Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

व्यंकय्या नायडू बनले उपराष्ट्रपती

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपप्रणीत ‘रालोआ’चे उमेदवार व्यंकय्या नायडू यांनी ...

news

भाजप युवा मोर्चाचा कार्यकर्त्याला अटक

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या कारवर शुक्रवारी गुजरातमध्ये दगडफेक करण्यात आली. ...

news

मुंबई : दादर चौपाटीवर 3 मुलांचा बुडून मृत्यू

मुंबईच्या दादर चौपाटीवर 3 मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे. शनिवारी सकाळी हा प्रकार घडला ...

news

चंद्राबाबुना गोळी घाला - जगमोहन रेड्डी

​आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्याबाबत वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष ...

Widgets Magazine