testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

देशातील प्रसिद्ध असलेली ओल्ड मॉन्क रम बद्दल माहित आहे का ?

old munk rum
Last Modified मंगळवार, 9 जानेवारी 2018 (17:25 IST)
ओल्ड मॉन्क या रमला पूर्ण देशात आणि विदेशात ज्यांनी प्रसिद्धी दिली ते पद्मश्री ब्रिगेडिअर (निवृत्त) कपिल मोहन यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाले आहे. ते अनेक दिवसांपासून आजारी होते. ६ जानेवारी रोजी गाझियाबाद येथे अंतिम श्वास घेतला. यामध्ये विशेषतः रम प्रकारात ‘ओल्ड मंक’ला जगभरात पोहचवले आहे. भारतीयांच्या पसंतीस उतरलेली रम म्हणून ओल्ड मंक लोकप्रिय आहे. जाणून घ्या कपिल मोहन यांनी प्रसिद्धीच्या शिखरावर नेले त्या रम बाबत अनेक गोष्टी !
‘ओल्ड मंक’ही रम भारतामध्ये १९५४ ला प्रथम दाखल झाली आहे. ही रम वाईन सारखी ठेवली जाते यामध्ये कमीत कमी ती सात वर्ष जूनी असते जर सुप्रीम आणि गोल्डन प्रकारातील ‘ओल्ड मंक’१२ वर्ष जूनी असते, सुप्रीम ‘ओल्ड मंक’ही मंक अर्थात एक साधूच्या आकारातील बाटलीमध्ये येते. या प्रकारात मंकचे डोके म्हणजे बाटलीचे झाकण असते आहे.‘ओल्ड मंक’अल्कोहोलचे प्रमाण वेगवेगळे असते. भारतामध्ये ४२.८ टक्के अल्कोहोल असणारी ‘ओल्ड मंक’विकली जाते जर अमेरिकेत विकल्या जाणाऱ्या ‘ओल्ड मंक’मध्ये अल्कोहोलचे प्रमाण ४० टक्के आहे. मात्र लष्करासाठी ५० टक्के अल्कोहोल असणारी ‘ओल्ड मंक’बनवली जाते मिलिट्री रम म्हणतात.‘ओल्ड मंक’भारतामधील सर्वाधिक विकली जाणारी रम आहे. ‘ओल्ड मंक’सहा वेगवगेळ्या प्रकारात उपलब्ध ९० एमएल, १८० एमएल, ३७५ एमएल, ५०० एमएल, ७५० एमएल आणि एक लिटर इतक्या स्वरूपात बाजारात मिळते. भारातातील गाझियाबादमध्ये तयार होणारी ‘ओल्ड मंक’भारताबरोबरच परदेशात जाते ही रम रशिया, अमेरिका, ब्रिटन, जपान, दुबई, इस्टोनिया, फिनलॅण्ड, न्यूझीलंड, केनिया, झांबिया, कॅमेरून, सिंगापूर, मलेशिया आणि कॅनडामध्ये फार प्रसिद्ध असून अनेक कंपन्या ती विकत घेतात. ‘ओल्ड मंक’ने अद्याप कधीही कोणत्याही प्रकारची जाहिरात केलेली नाही. त्यामुळे कंपनीचा जाहिरातीसाठी वेगळे बजेट नसते. ‘ओल्ड मंक’केवळ शाब्दिक चर्चांमधून लोकांपर्यंत पोहचली आहे अनेक दर्दिना याचे श्रेय दिले जाते. भारतामध्ये ‘ओल्ड मंक’वेगवेगळ्या गोष्टींबरोबर पितात पाणी, सोडा, सॉफ्ट ड्रिंक्सबरोबर‘ओल्ड मंक’चे सेवन करणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. ज्या रम ने कधी जाहिरात केली नाही ती रम इतकी प्रसिद्ध झाली आहे. या रमचे मालक वारले त्यामुळे पुन्हा एकदा ती प्रकाश झोतात आली आहे.


यावर अधिक वाचा :

Assembly Election Results 2018

 

राम मंदिर झालेच पाहिजे मराठवाड्यात लातुरात हुंकार सभेत

national news
मागच्या सत्तर वर्षांपासून राम मंदिराचा प्रश्न प्रलंबित आहे. प्रकरण न्यायप्रविष्टही आहे. ...

कांद्याची आयात शेतकऱ्यांच्या मुळावर

national news
दुष्काळामुळे त्रासलेला शेतकरी कांद्याला मिळालेल्या तुटपंज्या भावामुळे दुहेरी कात्रीत ...

खासदार पूनम महाजन यांनी आयआयटी मुंबईच्या बेटीक विभागाला ...

national news
खासदार पूनम महाजन यांनी त्यांच्या दत्तकखेड्यांत कमी खर्चातील वैद्यकीयउपकरणांविषयी शिबीर ...

विजय मल्ल्या प्रत्यार्पण : सीबीआय, ईडीचे पथक ब्रिटनला रवाना

national news
भारतीय बँकांचे 9 हजार कोटींहून जास्त रक्कम बुडवून फरार झालेला सम्राट विजय मल्ल्याच्या ...

भारताने प्रथम सामना 31 धावांनी जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी ...

national news
भारत आणि ऑस्ट्रेलियात एडिलेडमध्ये खेळत असलेला पहिला सामना भारतीय संघाने 31 धावांनी जिंकून ...
Widgets Magazine