मंगळवार, 2 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बंगळुरू , मंगळवार, 8 मे 2018 (12:41 IST)

कर्नाटक विधानसभेचा इतिहास

karnataka legislative assembly
पाच वर्षांमध्ये कधी तीन तर कधी चार मुख्यमंत्री
कर्नाटक विधानसभेचा इतिहास पाहाता सलग पाच वर्षे एकाच मुख्यमंत्र्याला कार्यकाळ पूर्ण करण्याची वेळ फारच कमी वेळा आल्याचे दिसून येते. विधानसभामध्ये एकेका वेळेस चार-चार किंवा तीन मुख्यमंत्री पाहिल्याची अनेकदा वेळ आली आहे.
 
पहिल्याच विधानसभेत के.सी. रेड्डी, केंगल हनुमंतय्या, कडिडल मंजाप्पा, एस. निजलिंगप्पा असे चार मख्यमंत्री होते. तर दुसर्‍या विधानसभेत एस. निजलिंगप्पा, बी.डी. जत्ती अशी जोडी होती. तिसर्‍या विधानसभेत आधी एस.आर. कांती आणि नंतर पुन्हा निजलिंगप्पा मुख्यमंत्री झाले. चौथ्या विधानसभेत निजलिंगप्पा सुरुवातीच्या काळात मुख्यमंत्री झाले पण नंतर वीरेंद्र पाटील मुख्यम‍ंत्री झाले. त्यानंतर पाचव्या विधानसभेत देवराज अर्स पूर्ण पाच वर्षे मुख्यमंत्री झाले पण सहाव्या विधानसभेत देवराज अर्स आणि आर. गुंडूराव मुख्यमंत्री होते. नंतर सातव्या विधानसभेत रामकृष्ण हेगडे मुख्यमंत्री झाले. मात्र ही विधानसभा दोन वर्षेच चालली. आठवी विधानसभा1985 साली स्थापन झाली. तिचा कार्यकाळ चार वर्षांचा होता त्यामध्ये हेगडेंबरोबर बोम्मईदेखील आले. नवव्या विधानसभेत वीरेंद्र पाटील, एस. बंगारप्पा आणि ए. वीरप्पा मोईली हे तीन मुख्यमंत्री होते. दहाव्या विधानसभेत एच.डी. देवेगौडा आणि जे.ए. पटेल हे मुख्यमंत्री होते.
 
अकराव्या विधानसभेत 1999 साली एस.ए. कृष्णा मुख्यमंत्री झाले. त्यांनी 2004पर्यंत सरकार चालवले. 2004 साली निवडणुका झाल्यावर त्रिशंकू विधानसभेत धरमसिंह पहिल्यांदा मख्यमंत्री झाले, त्यानंतर एच.डी. कुामारस्वामी आणि नंतर येडीयुरप्पा मुख्यमंत्री झाले. अशा प्रकारे या विधानसभेत तीन पक्षांचे तीन मुख्यमंत्री पदावर आले.