शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 21 मे 2023 (16:23 IST)

Kerala : मृत्यूनंतरही मुलाने अवयव दान करून 6 जणांचा वाचवला जीव

Kerala News : अवयवदान (organ donation) हे खूप महत्त्वाचं आहे. एका व्यक्तीने केलेल्या अवयवदानामुळे किती गरजू लोकांचे प्राण वाचू शकतात. हे सर्वानांच माहित आहे. अलीकडे अवयवदानासाठी जन जागृती केली जात आहे. नागरिक देखील जागरूकतेने मृत्यू नंतर आपल्या जवळच्या व्यक्तीचे अवयव दान करत आहे. केरळच्या एका दाम्पत्याने आपल्या मुलाच्या मृत्यू नंतर त्याचे अवयव दान करून सहा जणांना जीवनदान दिले आहे. पालकांच्या या धाडसी निर्णयासाठी त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. 
 
घडले असे आहे की शुक्रवारी केरळ मध्ये राज्याचे शिक्षण मंत्री व्ही शिवनकुट्टी यांनी 10 वी चा निकाल जाहीर केला गेला त्यात सारंग नावाच्या मुलाने चांगले अंक मिळवून अव्वल आला. असे सांगितले.  राज्यात सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. मात्र सारंगचा बुधवारी रस्ते अपघाती निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात होती. गेल्या बुधवारी सारंग आटोरिक्षाने घरी जात असताना ऑटो चालकाचे नियंत्रण सुटून रिक्षा विजेच्या खांबाला धडकली आणि पालटली त्यात सारंग बेशुद्ध झाला आणि कोमात गेला. ब्रेन डेड झाल्यामुळे त्याचे बुधवारी निधन झाले. त्याच्या पालकांनी सारंग गेल्यावर त्याचे अवयव दान करण्याचे ठरविले आणि त्याचे दोन मूत्रपिंड, एक यकृत, एक हृदयाची झडप आणि दोन कॉर्निया असे अवयव दान केले आणि 6 जणांना दान देऊन त्यांच्या कुटुंबात आनंद पसरवला. सारंगच्या पालकांच्या या धाडसी निर्णयासाठी त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. 
 
 
Edited by - Priya Dixit