रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 31 डिसेंबर 2018 (17:09 IST)

हैदराबाद-कोल्हापूर-बंगलोर विमानसेवा नियमितपणे सुरू

उडान योजनेच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत सुरू झालेली हैदराबाद-कोल्हापूर-बंगलोर विमानसेवा नियमितपणे सुरू आहे. या विमानसेवेच्या २३ व्या दिवशी एकूण १६४ जणांनी प्रवास केला. तर ही सेवा सुरू झाल्यानंतर पहिल्या आठ दिवसांत एकूण १००६ जणांनी प्रवास केला.
 
ही सेवा दैनंदिन स्वरूपातील असून, किमान १५० प्रवासी रोज प्रवास करतात. संबंधित सेवा सुरू होऊन २३ दिवस पूर्ण झाले आहेत. रविवारी हैदराबाद-कोल्हापूर मार्गावर ३९, कोल्हापूर-बंगलोर ४२, बंगलोर-कोल्हापूर ३९, तर कोल्हापूर-हैदराबाद मार्गावर ४४ जणांनी प्रवास केला. ही सेवा नियमितपणे सुरू आहे.
 
नववर्षाच्या पहिल्या दिवशी मंगळवारी हैदराबाद-कोल्हापूर आणि बंगलोर-कोल्हापूर या मार्गावर स्वतंत्र विमाने येणार असल्याची माहिती विमानतळ सल्लागार समितीचे सदस्य समीर शेठ यांनी दिली.