सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019 (09:08 IST)

अखेर कुलभूषण यांना मिळणार कायदेशीर मदत

माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना कायदेशीर मदत देण्यास परवानगी देण्यात आली असून, पाकिस्तानी वृत्तसंस्थेनुसार, जाधव यांना शुक्रवारी कायदेशीर मदत देण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयानंतर पाकिस्तान जाधव यांना कायदेशीर मदत देणार आहे. भारतीय वकिलांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयात आपली बाजू एवढ्या भक्कमपणे मांडली की केवळ पाकिस्तानी एकमेव न्यायाधीशांनी यासंदर्भातील निर्णयाला विरोध दर्शवला. मात्र इतर सर्व न्यायाधीशांनी एकमताने निर्णय मान्य केला. आता कुलभूषण जाधव यांना कायदेशीर मदत मिळणार असल्याने पुढील खटला लढवण्यास त्यांना बळ मिळेल. भारतीय विदेश मंत्रालयाचे प्रवक्ता रवीश कुमार यांनी बोलताना, आंतरराष्ट्रीय न्यायालायाच्या सुचनेनुसार पाकिस्तानने दिलेल्या निर्णयावर आमच्याकडून विचार होत असून, पाकच्या निर्णयावर संपूर्ण विचार करूनच मुत्सद्देगिरीने उत्तर दिले जाईल. तसेच, कुलभुषण संदर्भात देण्यात आलेला निर्णय हा आम्हाला माध्यमाद्वारे समजला आहे. माध्यमांनी दिलेल्या वृत्तावर आमचा विश्वास नाही. अधिकृतपणे पाकिस्तानकडून आम्हाला माहिती मिळाली नसल्याचे रवीश कुमार यांनी सांगितले आहे.