शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 27 नोव्हेंबर 2017 (16:51 IST)

लालू प्रसाद यांच्यासह ८ मोठ्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात

देशातील ८ मोठ्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली  आहे. यात बिहारमधील ३ मोठ्या नेत्यांचा देखील समावेश आहे. राजदचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्यासह २ माजी मुख्यमंत्र्यांची सुरक्षा देखील कमी करण्यात आली आहे. जीतनराम आणि जेडीयूचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष शरद यादव यांची सुरक्षा कमी करण्यात आली आहे. 

लालू प्रसाद यादव आणि जीतनराम मांझी यांना 'झेड प्लस' श्रेणीची सुरक्षा होती. आता दोघांना झेड सुरक्षा देण्यात आली आहे. याशिवाय राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (एनएसजी) कमांडो देखील लालूंच्या सुरक्षा रक्षकांमधून कमी करण्यात आले आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाने याशिवाय गुजरातचे राज्यमत्री हरिभाई चौधरी, सर्वोच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश टी एस ठाकूर, जामा मशिदीचे शाही इमाम बुखारी, दिल्लीचे माजी लेफ्टनंट गव्हर्नर नजीब जंग आणि माजी मुख्य निवडणूक आयुक्त नसीम जैदी यांची सुरक्षा कमी केली आहे. जुलै महिन्यात लालू प्रसाद यादव आणि त्यांची पत्नी राबडीदेवी यांना पटना विमानतळावर मिळणारी विशेष सुविधा देखील केंद्र सरकारने बंद केली होती.