शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

लालू यांची एक किडनी 60 टक्के निकामी

राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना पुढील उपचारासाठी मुंबईला हलविण्यात आले आहे.  लालू यांची एक किडनी 60 टक्के निकामी झाल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.
 
लालू यांना किडनी आणि डायबिटीज हे आजार आहेत.  लालूयादव यांच्यावर वांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समधील एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये आणण्यात आले.  लालूयादव यांच्यवर हृदय रोग तज्ज्ञ डॉ. पांड्या उपचार करणार आहेत. दरम्यान, नऊ वर्षांपूर्वी लालू यादव यांच्यावर बायपास सर्जरी त्यांनी केली होती. आता लालू यादव यांना किडनीवरील उपचारासाठी कर्नाटक राज्यातील बंगळुरु येणे नेण्यात येणार आहे. एम्स रुग्णालयाच्या रिर्पोटनुसार, लालूंची किडनी 60 टक्के निकामी झाल्या आहेत. तसेच लालूंना पाठ दुखीच्या देखील समस्या आहे, अशी माहिती आमदार भोला यादव यांनी दिली आहे.
 
दरम्यान, चारा घोटाळ्यातील एका प्रकरणात लालूप्रसाद यादव यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने सात वर्षांची शिक्षा सुनावली आहे.