Widgets Magazine

अंत्ययात्रेतच मृत झाला पुन्हा जिवंत!

भोपाळ- मृत समजलेली व्यक्ती जिवंत झाल्याचे आणि तय्ाचा एक- दोन दिवसांनी खरोखरच मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. मध्यप्रदेशातही नुकतीच अशी एक घटना घडली. त्यामध्ये एका मृत तरूणाला अंत्यसंस्कारासाठी नेले जात असताना अचानक त्याचा श्वासोच्छवास सुरू झाला. तो जिवंत झाल्याबद्दल लोकांना आनंद झाला, पण नंतर त्याचा दोन दिवसांनी मृत्यू झाला.
देदला नावाच्या गावातील 27 वर्षांच्या सुरज कांजी नावाचा एक तरूण अपघातात गंभीर जखमी झाला होता. त्याला पेटलावदमधील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तीन दिवसांनी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यामुळे त्याचे नातेवाईक व गावकर्‍यांनी त्याला देदलामध्ये आणले व 3 जुलैला त्याच्यावर अंत्यसंस्कारची तयारी करण्‍यात आली.


यावर अधिक वाचा :