1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 4 सप्टेंबर 2019 (10:00 IST)

काशिमरीमध्ये महाराष्ट्र सुरु करणार दोन भव्य रिसॉर्ट

Maharashtra to launch two grand resorts in Kashmir
जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द केलं आणि त्या ठिकाणी राज्याबाहेरील जनतेचा जमीन विकत घेण्याचा परवानगी मिळाली आहे. महाराष्ट्र सरकारची जम्मू-काश्मीरमध्ये जमीन विकत घेणार असून, त्या ठिकाणी आलीशान असे  रिसॉर्ट बांधणार आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला (MTDC) काश्मीर खोऱ्यात पहलगाम आणि दुसरे लेहमध्ये रिसॉर्ट बांधायचे आहे. या रिसॉर्टच्या माध्यमातून अमरनाथ यात्रा आणि वैष्णव देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या पर्यटकांना मदत केली जाईल असे एमटीडीसीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम रद्द केले आणि महिन्याभराने महाराष्ट्र सरकारने आपला जमीन खरेदीचा विचार जाहीर केला आहे. कलम ३७० रद्द झाल्यामुळे भारताच्या अन्य भागातील जनतेचा जम्मू-काश्मीरमध्ये जमीन खरेदी करण्याचा, गुंतवणूकीचा मार्ग मोकळा झाला आहे. जे याआधी शक्य नव्हते. दोन रिसॉर्ट बांधण्यासाठी प्रत्येकी एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे आता जम्मू आणि काश्मीर येथे बाहेरून चलन तर येईलच सोबतच अनेक नोकरीच्या संधी निर्माण होतील आणि युवकांना रिकामं बसण्या ऐवजी चार पैसे मिळतील.