बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 7 ऑक्टोबर 2017 (17:16 IST)

महात्मा गांधीच्या हत्येचा पुन्हा तपास, 30 ऑक्टोबरला सुनावणी

महात्मा गांधीच्या हत्येचा पुन्हा तपास व्हावा, यासाठी दाखल याचिकेवर 30 ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. याप्रकरणी देशाचे माजी महाधिवक्ते आणि ज्येष्ठ वकील अमरेंद्र शरण यांना एमेकस क्यूरी (न्यायालयाचे मित्र) म्हणून नियुक्त केलं आहे. न्यायमूर्ती एस.ए. बोबडे आणि न्यायमूर्ती एल. नागेश्वर राव यांच्या खंडपीठासमोर  सुनावणी झाली. 

या घटनेत दोन आरोपींना फाशीची शिक्षा झाली आहे. तसेच याप्रकरणाशी संबंधित इतरही लोकांचा मृत्यू झाला आहे. तर मग अशावेळी कायद्याचं पुन्हा औचित्य काय असेल? तसेच या प्रकरणी याचिकाकर्त्याकडे आणखी कोणते पुरावे आहेत का? असे विविध प्रश्न विचारले. गांधी हत्येसंदर्भातील फेर तपासणी करण्यासाठी अभिनव भारत, मुंबईचे संशोधक आणि विश्वस्त पंकज फडणीस यांनी एक याचिका दाखल केली आहे. या याचिकेमध्ये गांधी हत्येला इतिहासाचा सर्वात मोठा कव्हर-अप असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे या प्रकरणाची पुन्हा तपासणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.