शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: अहमदाबाद , शनिवार, 3 डिसेंबर 2016 (11:42 IST)

गुजरातच्या एका माणसाने केली 13 हजार 860 कोटींची संपत्ती जाहीर केली, पण....

सुमारे १३ हजार ८६० कोटींची बेहिशेबी संपत्ती घोषित करून त्याचा कर न भरणाऱ्या एक गडगंज प्रॉपर्टी डीलरचे कार्यालय व निवासस्थानावर प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाडी टाकल्या. महेश शहा असे या प्रापर्टी डीलरचे नाव असून अधिकाऱ्यांनी शहा यांच्या सीएच्या कार्यालयावरही छापे टाकले. दरम्यान, याबाबत प्राप्तिकर विभागाने कोणतीही वाच्यता केली नसली तरी शहा यांचे सीए तहमूल सेठना यांनी या धाडींना दुजोरा दिला आहे. सेठना हे शहा यांच्या अपाजी अॅडमिन अँड कंपनीचे भागीदारही आहेत. २९ व ३० नोव्हेंबर आणि १ डिसेंबर या काळात अधिकाऱ्यांनी या धाडी टाकल्या आहेत. शहा यांचा शोध बेहिशेबी उत्पन्न जाहीर केलेले शहा मात्र फरार आहेत. सेठना यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रॉपर्टी डीलर शहा यांनी आयडीएस योजनेअंतर्गत १३ हजार ८६० कोटींची संपत्ती जाहीर केली होती. योजनेची मुदत ३० सप्टेंबरला समाप्त झाली. परंतु शहा यांनी याचा कर मात्र भरला नाही.