Widgets Magazine
Widgets Magazine

इंदूरमध्ये दोन मुलांचे धूमधडाक्यात लग्न!

शनिवार, 5 ऑगस्ट 2017 (11:40 IST)

marriage

मध्यप्रदेशच्या इंदूरमध्ये दोन तरुणांचंच ग्रामस्थांनी लग्न लावून दिलं आहे. इंदूरजवळच्या मूसाखेडी गावात हे लग्न लावण्यात आलंय. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या तरुणांचं लग्न समलैंगिक संबंधातून लावण्यात आलं नाही, तर केवळ अंधश्रद्धेतून लावण्यात आलं आहे.

इंदूरच्या या तरुणांचं लग्न धूमधडाक्यात लावण्यात आलं. या लग्नात ग्रामस्थांनी धमाल केली. लग्नासाठी मोठा मंडप उभारला गेला. वऱ्हाडी मंडळींनी नाचत जल्लोषही केला. मूसाखेडी गावचे गावकरी पाऊस न आल्यामुळे त्रस्त आहेत. या भागात अशी समजूत आहे की, दोन तरुणांचं लग्न लावलं की पाऊस पडतो. याच अंधश्रद्धेतून या दोघांचं लग्न लावण्यात आलंय.

या तरुणांच्या लग्नानंतर थोड्याच वेळात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊसही कोसळला. त्यामुळे नागरिकांनी याला तरुणांच्या लग्नाचा परिणाम समजत आनंद व्यक्त केला. दरम्यान हवामान खात्यानंही मध्यप्रदेशमध्ये इंदूर परिसरात पुढील आठवड्यात पावसाचा अंदाज वर्तवला आहे.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

डोक्लाम वादा : चीनकडून पुन्हा एकदा भारताला इशारा

सिक्किम सीमेवरील डोक्लाम वादावरुन चीनने पुन्हा एकदा भारताला इशारा दिला आहे. आतापर्यंत ...

news

आता सुभाष देसाईंवरही भ्रष्टाचाराचा आरोप

आता उद्योगमंत्री सुभाष देसाईंवरही भ्रष्टाचाराचा आरोप झालाय. इगतपुरीजवळची एमआयडीसीसाठी ...

news

प्रकाश मेहतांनी यांची राजीनाम्याची तयारी

एसआरए घोटाळ्यामुळे अडचणीत आलेले गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी अखेर पद सोडायची ...

news

गुजरात : राहुल गांधी यांच्या गाडीवर हल्ला

गुजरातमध्ये काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आलाय. बनासकांठा ...

Widgets Magazine