testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

मेधा पाटकर यांना 12 कार्यकर्त्यांसह अटक

Last Modified मंगळवार, 8 ऑगस्ट 2017 (11:56 IST)

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना पोलिसांनी बळाचा वापर करत अटक केली आहे. मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील चिखल्दा गावात मेधा पाटकर अहिंसेच्या मार्गाने आंदोलन करत होत्या. गेल्या 12 दिवसांपासून मेधा पाटकर सरदार सरोवरावर बांधण्यात येणाऱ्या धरणाच्या उंचीविरोधात उपोषणाला बसल्या होत्या.

मेधा पाटकर यांच्या उपोषणस्थळी पोलिस पोहोचले आणि त्यांना हटवण्याचा प्रयत्न केला. यावेळी कार्यकर्त्यांशी पोलिसांची बाचाबाची झाली. त्यानंतर पोलिसांनी मेधा पाटकर यांच्यासोबत एकूण 12 कार्यकर्त्यांना अटक केली आणि रुग्णवाहिकेतून घेऊन गेले. अहिंसेच्या मार्गाने आवाज उठवणाऱ्या मेधा पाटकर आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केल्याने सर्वच स्तरातून मध्य प्रदेश सरकार आणि पोलिस प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला जातो आहे.यावर अधिक वाचा :