बॅनर्जी यांच्या आंदोलनाला मनसेचा पाठिंबा
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सीबीआय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारविरोधात बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला देशभरातील विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून पाठिंबा मिळत आहेत. दरम्यान, मनसेप्रमुखराज ठाकरेयांनीसुद्धा ममता बॅनर्जी यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
ममता बॅनर्जी यांनी आंदोलनाला सुरुवात केल्यानंतर मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. ''केंद्राच्या एकाधिकारशाही विरोधात मा. ममता बॅनर्जी ह्यांनी जो आवाज उठवला आहे त्याबद्दल त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन आणि त्यांच्या ह्या लढ्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाठिंबा मी जाहीर करतो,'' असे राज ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.