Widgets Magazine

मोदींनी केले नितीश कुमारांचे अभिनंदन

Last Modified गुरूवार, 27 जुलै 2017 (11:04 IST)

नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. नितीश कुमार यांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात घेतलेल्या भूमिकेला अवघ्या देशाचा पाठिंबा आहे, असे ट्विट पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. विशेष म्हणजे नितीश कुमार यांनी राजीनामा दिल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये पंतप्रधान मोदींनी ट्विटरवर या प्रकरणावर भाष्य केले. त्यामुळे आता बिहारमध्ये भाजप नितीश कुमार यांना पाठिंबा देण्याची दाट शक्यता आहे.

‘भ्रष्टाचारविरोधी लढाईत सहभागी झाल्याबद्दल नितीश कुमार यांचे खूप खूप अभिनंदन. सव्वाशे कोटी जनता तुमच्या प्रामाणिकपणाचे स्वागत आणि समर्थन करते आहे,’ असे ट्विट पंतप्रधान

नरेंद्र मोदी यांनी केले आहे.यावर अधिक वाचा :