Momo Challenge मुळे भारतात पहिला मृत्यू, विद्यार्थीने नस कापून फाशी लावली
Momo WhatsApp Challenge गेम मुळे भारतात पहिला मृत्यू झाल्याची बातमी आली आहे. राजस्थानच्या अजमेर येथे दहावीच्या विद्यार्थीने हाताची नस कापून फाशी लावून आत्महत्या केली.
मुलांसाठी ब्लु ह्वेलनंतर आता Momo WhatsApp चॅलेंज जीवाला धोका देणार ठरतं आहे. या धोकादायक खेळामुळे पहिला जीव गमवण्याची बातमी राजस्थानच्या अजमेरची आहे जिथे मोमो गेममध्ये फसून दहावीच्या मुलीने आत्महत्या केली. बातमीप्रमाणे मुलीने वाढदिवसाच्या तीन दिवसानंतर हाताची नस कापली आणि मग फाशी लावून घेतली. तिच्या मोबाइलच्या ब्राउझर हिस्ट्री, मोमो चॅलेंज गेमचे नियम आणि शरीरावरील निशाणामुळे शंका व्यक्त केली जात आहे.
15 वर्षाच्या या मुलीने आपल्या वाढदिवसाच्या तीन दिवसानंतर 31 जुलै रोजी आत्महत्या केली होती. तपासणीत मोमो चॅलेंजमुळे जीव गेल्याचे कळून आले आहे. ब्लु ह्वेल गेमप्रमाणे या खेळात ही शेवटला टास्क मृत्यू असते. सुसाइड नोटमध्ये वाढदिवसाच्या दिवशी मरण्याची इच्छा होती असेही लिहिलेले आहे.