खासदाराने तरुणाला मारली थप्पड Video Viral
झारखंडमधील रांची येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेदरम्यान, भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी मंचावर एका तरुण कुस्तीपटूला चापट मारली. रांचीच्या खेल व्हिलेजमधील शहीद गणपत राय इनडोअर स्टेडियममध्ये राष्ट्रीय कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेदरम्यान ही घटना घडली. तरुण कुस्तीपटूला थप्पड मारण्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाला.
भाजप खासदाराने तरुण पैलवानाला मारली थप्पड
अंडर-15 राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेच्या व्हायरल व्हिडिओमध्ये, उत्तर प्रदेशातील भाजप खासदार तरुण कुस्तीपटूला वारंवार थप्पड मारताना दिसत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ज्या तरुणाला थप्पड मारण्यात आली, तो 15 वर्षांपेक्षा जास्त वयाचा होता. त्याच्या वयामुळे त्याला स्पर्धेतून अपात्र ठरवण्यात आले. त्यानंतर तो तरुण मंचावर पोहोचला आणि प्रमुख पाहुणे आणि न्यायाधीशांना विनंती करू लागला. यानंतर भाजप खासदाराचा संयम सुटला आणि त्यांनी तरुणाला मारहाण करण्यास सुरुवात केली.