testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

नाशिकमध्ये धाडसी दरोडा, मुथूट फायनान्सचा कर्मचारी ठार

murder
Last Modified शुक्रवार, 14 जून 2019 (17:13 IST)
नाशिकच्या उंटवाडी परिसरातील सिटी सेंटर मॉलजवळील मुथूट फायनान्सच्या कार्यालयावर शुक्रवारी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास धाडसी दरोडा पडला. दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात एका कर्मचारी ठार झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहे.

मुथूट फायनान्सचे कार्यालय उघडल्यानंतर चार दरोडेखोर आत घुसले. मॅनेजर आणि वॉचमनसह चौघांवर दरोडेखोरांनी गोळीबार करत लाखो रूपयांचा मुद्देमाल लुटून नेण्याचा प्रयत्न केला. दरोडेखोरांच्या हल्ल्यात तीन गोळ्या लागल्याने एका कर्मचार्‍याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपाचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. शाजू सॅम्युल (वय ३२) असे त्यांचे नाव आहे. तर चंद्रशेखर देशपांडे, कैलास जैन अशी जखमींचे नावे आहेत. त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहे.
दरम्यान, दरोड्याची माहिती मिळताच पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील आदींसह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहे. पोलिस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली तपासाला सुरूवात करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी लूट झाली नसल्याचे सांगितले.


यावर अधिक वाचा :

ICC चे हे 7 नियम वर्ल्डकप स्पर्धेत पहिल्यांदाच लागू होतील

national news
क्रिकेट वर्ल्ड कपचा 12वा संस्करण ग्लंड-वेल्समध्ये 30 मे पासून सुरू होईल. यावेळी फक्त 10 ...

ज्या गुरुजीने लग्न लावून दिले, त्यासोबत 15 दिवसाने पळाली ...

national news
ऐकायला फिल्मी आणि विचित्र वाटेल पण ज्या गुरुजीने लग्न लावून दिले, नवरी त्यासोबत पळून ...

Whatsapp वर येणार आहे हा खास फीचर, करेल वेळेची बचत

national news
सोशल मीडिया वापरकर्त्यांसाठी एक चांगली बातमी आहे. व्हाट्सएप एक नवीन फीचर आणत आहे ज्याच्या ...

लठ्ठ असल्यामुळे सासरच्यांकडून छळ, विवाहितेची आत्महत्या

national news
ती शरीराने जरा जाड होती पण जाड असणे गुन्हा तर नाही. पण सतत कोणाला याची जाणीव करुन देणे ...

ड्यूल स्क्रीन लॅपटॉप, जाणून घ्या फिचर्स

national news
कॉम्पुटेक्ट 2019 कॉन्फरन्समध्ये Asus ने ड्यूल स्क्रीन असणारा लॅपटॉप लाँच केला आहे. ...

काय लीची खाल्ल्यामुळे येतोय चमकी ताप? 100 हून अधिक मुलांनी ...

national news
बिहारच्या काही भागात अक्यूट इंसेफेलाइटिस सिंड्रोम (AES) अर्थात चमकी तापामुळे आतापर्यंत 10 ...

पोटातून काढण्यात आल्या किल्ल्या, नेलकटर, शिक्के आणि अंगठीसह ...

national news
उदयपुर- येथे एमबी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर देखील तेव्हा हैराण झाले जेव्हा एका तरुणाच्या ...

जनगणना २०२१ ची तयारी सुरु

national news
देशाच्या सर्वात मोठ्या प्रशासकीय कामाची म्हणजेच जनगणना २०२१ ची तयारी सुरु झाली आहे. ...

नाशिकमध्ये धाडसी दरोडा, मुथूट फायनान्सचा कर्मचारी ठार

national news
नाशिकच्या उंटवाडी परिसरातील सिटी सेंटर मॉलजवळील मुथूट फायनान्सच्या कार्यालयावर शुक्रवारी ...

IIT-JEE : महाराष्ट्राचा कार्तिकेय गुप्ता देशात पहिला

national news
Indian Institute of Technology (आयआयटी) प्रवेशसाठीची IIT-JEE Advanced प्रवेश या परीक्षेत ...