शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 27 मे 2017 (09:46 IST)

2022 पर्यंत शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करणार : पीएम

2022 पर्यंत शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे लक्ष्य असल्याचा पुनरुच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदीं केला आहे. ते सरकारला तीनवर्ष पूर्ण झाल्याबद्दल आसामच्या गुवहाटीमध्ये आयोजित सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी देशवासियांचे आभार मानले. आम्हाला सरकार बनवण्याची, मला प्रधान सेवक म्हणून काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी देशाच्या जनतेचे आभार मानतो असे मोदी म्हणाले. देशाच्या भल्यासाठी आम्ही जी पावले उचलली त्या प्रत्येक निर्णयात 125 कोटी देशवासियांनी आम्हाला साथ दिली असे मोदी म्हणाले. आमच्या सरकारने गरीबांच्या विकासासाठी त्यांचे जीवन अधिक सुखकर करण्यासाठी प्रयत्न केले असे मोदींनी सांगितले. यापूर्वी देशात काळे धन होते आता जनधन आणि डीजी धन आहे.  आम्ही 1 हजार गावे ऑप्टीकल फायबरने जोडली. यापुढेही आम्ही आमचे काम चालू ठेवू असे मोदी म्हणाले.  मी माझे मन, शरीर, आत्मा आणि आयुष्य देशाला समर्पित केले आहे असे मोदी म्हणाले.