Widgets Magazine

पंतप्रधानांकडून २ लाख रुपयांची मदत जाहीर

Last Modified सोमवार, 31 जुलै 2017 (16:53 IST)

मुंबईतील घाटकोपरमधील साईदर्शन इमारत कोसळल्याने मृत्यूमुखी पडलेल्या रहिवाशांच्या कुटुंबीयांना पंतप्रधानांकडून २ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर या दुर्घटनेतील जखमींना ५० हजार रूपयांची मदत केली जाणार आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून सोमवारी ट्विटरच्या माध्यमातून या निर्णयाबद्दलची माहिती देण्यात आली. यापूर्वी राज्य सरकारने मृत्यूमुखी पडलेल्या रहिवाशांच्या कुटुंबीयांना दोन लाख रूपयांची मदत जाहीर केली होती.

या दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू झाला, तर २८ जण जखमी झाले होते.यावर अधिक वाचा :